प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची निवड
उरण दि 19(वार्ताहर )प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दैनिक आपले साम्राज्य व दैनिक वादळवारा या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची निवड करण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विठ्ठल ममताबादे हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्य केले आहे.आपल्या पत्रकारितेतून आजपर्यंत त्यांनी अनेक गोरगरिबांना, सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे.सर्वसामान्य नागरिकाला, गोरगरीब व्यक्तींना केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली पत्रकारिता जोपासली आहे.पत्रकारांच्या विविध समस्यांची, प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. उरण तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमात ते नेहमी सक्रिय असतात. विठ्ठल ममताबादे हे उच्चशिक्षित, सुसंस्कारित असलेले व्यक्तिमत्व आहे.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील पदवी व पदविकाचे शिक्षण पूर्ण केले आहे.
विठ्ठल ममताबादे संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिलाध्यक्षा दिपीका चिपळूणकर, कोकण सरचिटणीस पंडित फंगाळ, महेश महाजन, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. रत्नाकर पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी, जिल्हा संघटक हरिश्चंद्र महाडिक, जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, जिल्हा उपाध्यक्ष, संतोष शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद गोरेगावकर, समीर बामुगडे या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि. ३१/०३/२०२२ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.त्यांचे कार्य पाहून पुढील बढती दिली जाणार आहे.डी.टी.आंबेगावे संस्थापक अध्यक्ष, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्तीपत्र देऊन पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची नियुक्ती रायगड जिल्हा सरचिटणीस पदी झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.