अल्पवयीन मुलीचे अपहरण
पनवेल दि.२० (संजय कदम) : एका १४ वर्षीय मुलीस कोणत्यातरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमिष दाखवून तिच्या भावाच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सदर मुलगी रंगाने गोरी, बांधा सडपातळ, उंची ५ फूट, केस लांब व सरळ, उजव्या हातावर सिमरन असे गोंदलेले आहे. चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे आहेत. अंगात राखाडी रंगाची कुर्ती व पिवळ्या रंगाची लेगिन्स घातलेली आहे. या मुलीबाबत कोणाला माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-२७४५२३३३ किंवा सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा.