महावितरण कंपनीच्या रोहित्रामधील ऑईलची चोरी
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः महावितरण कंपनीच्या रोहित्रामधील ऑईलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना तालुक्यातील तळोजा येथील देवीचापाडा परिसरात घडली आहे.
शासकीय महावितरण कंपनीचे देवीचापाडा या ठिकाणी रोहित्र असून त्या ठिकाणी असलेल्या जवळपास 50 हजार रुपये किंमतीचे 500 लीटर केव्हीए मधील ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.