तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान
पनवेल दि.04 (वार्ताहर)- तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतेही नुकसान झालेले नाही.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र इंडस्ट्रीज,प्लॉट नं L/86, तोंडरे गाव या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली होती. सदर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब व तळोजा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. कंपनीत फिनेलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जात असून कंपनीत एकूण 200 लिटरचे रॉ मटेरियल भरलेले 150 प्लास्टिक /लोखंडी ड्रम व रिकामे 50 ड्रम होते. आग कशामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाचे अधिकारी घेत आहेत.