लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ७० मुलांना मोफत ऑफलाईन कोचिंग क्लासेस.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील कळंबोली,कामोठे,रोडपाली परिसरातील सर्व सुज्ञ पालक बंधु भगिनीनां कळविण्यात येते की कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग आर्थिक संकटात सापडले आहे, या महाभयंकर महामारीमुळे सर्व स्तरांतील लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे समाजात आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. या कोविड- १९ च्या महामारीच्या संकटामध्ये सर्वात जास्त नुकसान शैक्षणिक क्षेत्रात झाले आहे. या महामारीमुळे विद्यार्थांना योग्य ते शिक्षण मिळाले नाही. हे संकट कधी संपेल सांगता येणार नाही पण या संकट समयी मुलांच्या शिक्षणाकडे कसे लक्ष द्यावे, ही पालक वर्गची मुख्य समस्या आहे. आम्ही आपल्या पाल्याबाबत सुष्म विचार केला आणि त्यातून असे दिसून आले की महाराष्ट्र शासन यंदा कदाचित कोविड – १९ मुळे इयत्ता १० वी व १२ वी सोडून इतर सर्व वर्गांना पास देखील करतील किंवा थोड्या फार मार्कांची परीक्षा देखील घेतील. परंतु मुळ प्रश्न मुलांसमोर आणि पालकांसमोर हा आहे की जेव्हा पासून कोविड – 19 ची सुरवात झाली तेव्हा पासून सर्व काही शिक्षण हे ऑनलाईन पध्दतीने चालू आहे. सर्व वर्गातील विद्यार्थांना याचा काही फायदा झालेला नाही, एक प्रकारे त्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी च्या मुलांना तर गणित, इंग्रजी, तसेच विज्ञान या विषयाचे बिलकुल ज्ञान समजले नाही, ८ वी च्या मुलांना आता गणित एकच विषय आहे परंतु तीच मुले ९ च्या वर्गात गेल्यावर तेच गणित दोन भागात विभागले जातात , सायन्स देखील त्याच प्रकारे दोन भागात विभागले जाते, या मुलांना जर ८ वी मध्ये गणित, सायन्स, इंग्रजी विषयाचे बेसिक समजले नाही तर १० वी मध्ये या मुलांना कसे समजेल, आता त्यांच्या या विषयाचा पाया पक्का होणे अत्यंत गरजेचे आहे.
वरील सर्व गोष्टीचा काळजीपूर्वक विचार केला तर असे निदर्शनास येते की मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे, कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान त्यांना मिळाले नाही, वरील सर्व गोष्टीचा मुलांचे शेक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना सर्व विषयांचे चांगल्या प्रकारे ज्ञान मिळावे हीच आमची तीव्र इच्छा, म्हणून आम्ही सामाजिक बांधीलकी जपून असा विचार केला आहे की इयत्ता ८वी ते १० वी ( सेमी/ इंग्रजी/ सीबीएसई) तसेच ११ वी, १२वी ( सायन्स/ कॉमर्स) अशा मुलांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम येणाऱ्या ७० विद्यार्थ्यांना ” मोफत ऑफलाइन ” शिक्षण उपलब्ध करून देत आहोत, तरी परिसरातील सर्व नागरिकांना याचा फायदा घ्यावा असे आवाहन राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल – रायगड यांच्यावतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा : मा श्री. सनिल दादासाहेब कदम : 8779684308, 9320646555.
नियोजक : मा.श्री.केवल दिपक महाडिक व मा.श्री.आशिष आनंदा तांबे.