लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांना “सलून आपल्या दारी” उपक्रमांतर्गत देण्यात आली मोफत सलून सेवा.
पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या आशिर्वादाने व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या आदेशाने व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, उपाध्यक्ष नारायण कोळी, सचिव मंगेश लाड, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून उन्हातानात आपले कर्तव्य बजावणाऱ्या व वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सलून आपल्या दारी या उपक्रमातुन त्यांना जागेवर जाऊन सलून सेवा देण्यात आली. पनवेल, कळंबोली, तळोजा व गव्हाण फाटा या वाहतुक शाखेतील वाहतूक पोलिसांना सलून सेवा मोफत देण्यात आली. या उपक्रमाचे वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी पनवेल शहाराध्यक्ष अनुराग वाघचौरे यांनी सेवा दिली. सोबत खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे व ओमकार महाडिक उपस्थित होते.
