पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील धान्य दुकानदारांचे माहे एप्रिल 2021 चे मासिक धान्य नियतन व ई-पॉज मशिन बंद करण्याची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिशन पनवेलची मागणी
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील धान्य दुकानदारांचे माहे एप्रिल 2021 चे मासिक धान्य नियतन कमी करण्याची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिशन पनवेलने उपायुक्त पुरवठा विभाग कोकण भवन यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
देशात व महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेने महाभयंकर प्रादुर्भाव होत असून रूग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून निघाले आहेत. कोरोना व्हररसच्या प्रादुर्भावाने नवे रूग्णा आणि संक्रमणामुळे होणारे मृत्यू यांच्या वाढत्या आकडेवाढीमुळे सध्या दुकानदार व जनतेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोना महासंकट सुरू झाल्यापासून सध्या शासनाने बायोमेट्रीक पध्दतीचा वापर सुरू केल्यामुळे बहुतेक ठिकाणी रास्त भाव धान्य दुकानदार व लाभार्थी कार्डधारक यांच्यामध्ये बायोमेट्रीक पध्दतीची सक्ती सुरू आहे. शासनाने बायोमेट्रीक पध्दतीने (थंब) अंगठे असतील तरच धान्य वितरण करावे, असे स्पष्ट संकेत पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंमलात आणण्यासाठी सक्ती करण्यांत येत आहे.
सध्या कोरोना माहामारीचे दुस यांदा महाभयंकर संकट आल्यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यांस आप आपल्या कुवतीने सज्ज होत आहे. दुकानदार सुध्दा आपल्या पध्दतीने कोरोना महामारीचा सामाना करीत आहे. अशा ’परिस्थितीत बायोमेट्रीक मशीनवर (थंब) अंगठयाची सक्ती केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणांत वाढण्यांची शक्यता नाकारता येत नाही. लाभार्थी कार्डधारक हे गरीब स्तरावरील असल्यामुळे त्यांना कामधंदयासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, त्यांचा सतत संपर्क असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यांची दाट शक्यता आहे. तसेच आपल्या सारख्या वरिष्ठ अधिकार्यांनी व कल्याणकारी सरकारने कमीत कमी कोरोनाच्या दुसर्या पर्वात बायोमेट्रीक अंगठयाची सक्ती करू नये, अशी तमाम कार्डधारकांची आणि धान्य दुकानदारांची माफक मागणी आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील व पनवेल तालुक्यातील धान्य दुकानदारांचे माहे एप्रिल 20219 चा मासिक धान्य नियतन कमी करून शासनाने लाभार्थी कार्डधारकांचे धान्य कोट्यात कमालीची कपात केलेली आहे. या कोरोनाच्या बंद काळात कमीत कमी दुकानदार यांच्याकडून कार्डधारकांना उपजिविकेसाठी धान्य मिळण्यांची शाश्वती असते, आपणांस व शासनास विनंती की शासनाने कार्डधारकांचा धान्याचा कोटा कमी करू नये अन्यथा ग्रामीण भागातील जनता रस्त्यावर येईल, वेळ प्रसंगी ’भूकबळीची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत योग्य तो जनहितार्थ निर्णय घेवून कोरोना महामारी बंद काळात ई पॉज मशीनवरील बायोमेट्रीक थंबची अनिवार्य सक्ती पध्दत तत्काळ बंद करणे आवश्यक व गरजेचे आहे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केली आहे.
