नवीन पनवेल राजीव गांधी मैदानामध्ये विहिरीत आढळाअनोळखी मृतदेह
पनवेल/वार्ताहर:राजीव गांधी मैदान नवीन पनवेल येथील विहिरी मध्ये दिनांक ०१/०४/२०२१ वेळ सकाळी ८ वाजता पडलेला अनोळखी इसम आढळून आला त्यास अग्निशामक दलाच्या कर्मच्याऱ्यांच्या मदतीने बाहेर काढुन अम्बुलन्स मधून उपजिह्वा रुग्णालयाल पनवेल येथे दवा उपचारास नेले असता तेथील डॉक्टरांनी दवा उपचारास दाखल करण्यापूर्वीच मयत म्हणून घोषित केले.अजून सदर व्यक्तीची ओळख पटली नसून, सदर इसमाचे ४० ते ४५ वय वर्षे,रंग- गहूवर्णीय,चेहरा – उभट,अंगाने-मध्यम,नाक-सरळ,केस -काळे वाढलेले,दाढी -बारीक काली पाढंरी,उंची- अंदाजे ५ फूट ४ इंच, अंगात -काळ्या कलरची फुल पँट व चॉकलेटी रंगाचा फुल शर्ट असून सदर इसमास ओळखत आसलयास खांदेश्वर पोलिसस्टेशनशी ०२२२७४६५३३८या क्रमांकावर संपर्क करा असे आव्हान करण्यात आले आहे