आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरजू गोरगरीब रुग्णांना रक्ताची तातडीने खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता गोरगरिबांना त्वरित रक्ताचा पुरवठा व्हावा या दृष्टीकोणातून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था चाणजे विभाग तर्फे गुडीपाडवाचे औचित्य साधून MGM हॉस्पिटल कळंबोली यांच्या सहकार्याने मंगळवार दि 13/4/2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जेष्ठ नागरिक उद्यान, मुळेखंड फाटा, उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना काळातही या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 82 रक्त दात्यांनी रक्तदान केले. सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शासनाचे नियम पाळत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.
राज्यात उदभवलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने जास्तीत जास्त इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थे तर्फे करण्यात आले होते.या आवाहनाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून 82 रक्त दात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
संस्थेच्या वतीने यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत, सामाजिक कार्यकर्ते -संतोष पवार, जिल्हा परिषद सदस्य -विजय भोईर, इंदिरा ग्रामीण रुग्णालय उरणचे अधीक्षक -डॉ मनोज भद्रे,ONGC कर्मचारी -अरविंद घरत, माजी सरपंच -जितेंद्र घरत, चाणजे ग्रामपंचायत कर्मचारी -संजीवन रावले, चाणजे विभागातील अंगणवाडी सेविका यांना गुलाबपुष्प प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे सुमित थळे-चाणजे विभाग अध्यक्ष,चेतन गावंड, सागर म्हात्रे, रवींद्र भोईर, समीर ठाकूर, करण नारंगीकर, प्रशांत पाटील, रवी मोकल, तुषार पाटील, अजय म्हात्रे, विशाल पाटील, महेश पाटील, संग्राम ठाकूर, रत्नदीप पाटील, वैभव म्हात्रे, संदेश म्हात्रे, शुभम म्हात्रे, हर्षद म्हात्रे, चंद्रशेखर भोमकर, सुनील टाक, अतिष म्हात्रे, गौरव तांबडे आदी संस्थेच्या पदाधिकारी -सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.