सोन्याची बनावट शिक्के देवून फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागने केले गजाआड
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः सोन्याचे बनावट शिक्के देवून फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागने गजाआड केले असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.
ओरीजनल सोन्याचे शिक्के खोदकाम करताना सापडले आहेत त्यांना पैशांची खुप गरज असून ती विकायची आहेत, असा खोटा बहाणा करून तकारदार यांना हातचलाखी करून त्यांचेकडून 65 लाख रूपयांच्या बदल्यात त्यांना पितळी धातुचे शिक्के देवून त्यांची फसवणूक केलेबाबत दोन अनोळखी पुरूष व एक अनोळखी महिला यांचेविरूध्द मांडवा सागरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाची तीव्रता पाहाता रायगड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना आदेशीत केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, यांनी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक तपास पथक तात्काळ तयार करून नमुद स्वरूपाचे गुन्हे करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा व त्यांच्या टोळयांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सदर शोध घेत असताना तपास पथकातील पोहवा अमोल हंबीर यांनी गोपनीय माहिती प्राप्त करून सदरचे गुन्हे करणारे आरोपीत हे गुजरात राज्यातील वडोदरा, वलसाड भागात असल्याचे निष्पन्न केले. त्याप्रमाणे, सपोनि धनंजय पोरे, सपोनि युवराज खाडे व पोउनि सचिन निकाळजे व त्यांचे तपास पथकाने पोहवा अमोल हंबीर यांच्या प्राप्त माहितीप्रमाणे 10 दिवस गुजरात राज्यातील वडोदरा वलसाड येथे राहून अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपींची माहिती प्राप्त केली. परंतु, सदर आरोपीत हे अत्यंत हुशार असल्याने ते एका ठिकाणी राहात नव्हते, तसेच त्यांचेविरूध्द तांत्रिक पुरावा सुध्दा उपलब्ध होत नव्हता. तरी देखील सदर तपास पथकाने निष्पन्न आरोपीतांचा शोध घेण्याचे प्रयत्न मागील एक महिन्यापासून चालुच ठेवले होते. सदर तपास पथकाने नमुद आरोपीतांचा शोध घेवून आरोपी प्रभुभाई गुलशनभाई सोलंकी उर्फ कल्पेश प्रजापती, वय 37 वर्षे, रा. बी/29, रा. बी/ 29, कल्याणनगर सोसायटी, आजवा रोड, जि.वडोदरा, राज्य गुजरात, मणिलाल नारायण राठोड उर्फ महेश प्रजापती, वय 52 वर्षे, रा.कारेलीबाग, जि.वडोदरा, राज्य गुजरात, अर्जुन भिकाभाई सोलंकी, वय 25 वर्षे, रा.डींडोली, जि.सुरत, लक्ष्मीदेवी शंकर गुजराती, वय 45 वर्षे, मुळ रा. 692 सेक्टर नं. 03, गांधीनगर, जि.भोपाळ, रा.खडवली, पो.पडघा, जि.ठाणे आरोपीत कमांक 1 ते 3 यांना मजनगंज, जि.अजमेर, राज्य राजस्थान येथून तसेच आरोपीत नं. 4 यांना खडवली, पडघा, जि.ठाणे येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले