सी.एन.जी.गाड्यांत आग लागण्याच्या प्रकारात वाढ
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः घरटी एक फोर व्हीलर हे प्रमाण वाढीस लागल्याने व त्यातच विविध फायनान्स कंपन्याच्या वाढत्या प्रभावामुळे चार चाकी गाड्या विकत घेणाचा मार्ग सोईचा झाल्याने एखादा सर्व सामान्य नोकरदार देखील गाडीच्या मोहाला येत्या काही वर्षांपुर्वी आवरू घालु शकला नाही.
सोसायटीच्या आवारात चार चाकींचा तर ज्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्तो रस्ती चार चाकी गाड्याच गाड्या आज मितीला प्रत्येक राज्यात पहावयास मिळत आहेत. हळुहळु काळ बदलत गेला पेट्रोल डीझेलचे भाव गगनाला भीडु लागल्याने गाड्यांच्या (अॅव्हरेज) वर सर्व सामान्य बोलु लागले वाढत्या पेट्रोल मुळे आता चारचाकी परवडत नाही रे बुवा परंतु याच मितीला अॅडव्हान्स टेक्नॉलजी ने एक जादुई कांडी फीरविल्या प्रमाणे फोर व्हिलर चक्क स्वस्त दरांत उपलब्ध होणारी सी.एन.जी.गाडी आली विविध कंपन्यांनी कंपनी फीटेड सी.एन.जी.गाडी मार्केट मध्ये आणली आधीच या करीता सी.एन.जी.पेट्रोल पंपची ही सुविधा मोठ्या शहरात जागोजागी सोय केली गेली असल्याने पेट्रोल से सी.एन.जी सस्ता या उक्ती ने विविध राज्यातील मोठ मोठ्या शहरात सी.एन.जी.गाडया रस्त्यावर धाऊ लागल्या नंतर बसेस सुध्दा सी.एन.जी.आल्या मग बाजारातही सी.एन.जी.कीट अत्यंत अल्प दरात विविध स्तरावर सर्व सामान्य आपल्या पेट्रोल गाड्या सी.एन.जी.किट लाऊन घेऊ लागले. हे फॅड कमालीचे वाढत गेले पेट्रोल अंत्यत नाममाञ किमतीत असतानाही वर्षानुवर्षे अपघात वगळता पेट्रोल गाडीने कधी पेट घेतल्याचे ऐकीवात नाही परंतु आज मितीला सी.एन.जी.गाड्यांना आगी लागण्याच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवते विविध राज्यात फक्त सी.एन.जी.गाड्यानी अचानक कोणताही अपघात न होता ह्या गाड्या पेट घेण्याच्या प्रकारात दिवसेगणीक वाढ होताना दिसत आहे. मग त्या गाडीत कंपनी फीटींग सी.एन.जी.किट असो अथवा मार्केटचे लोकल सी.एन.जी.किट असो असे भयावह प्रकार सातत्याने पहावयास मिळतात. पनवेल तालुक्यात टी.पॉईन्ट जवळ एका सॅलेरो गाडीने अचानक पेट घेतल्याने पुर्ण चारचाकी गाडी भस्मसात झाली तर पळस्पे पुला खाली नुकतीच एक चार चाकी जळुन खाक झाली अलीबाग मध्ये ही काही दिवसांपूर्वी एक उभ्या कारने भर बाजारात पेट घेतल्याने सी.एन.जी.जरी स्वस्त वाटत असेल परंतु ती वरील घटनांमुळे धोकादायकच ठरू शकते.सी.एन.जी.कीट वर जेव्हापासुन गाड्या धाऊ लागल्या तेव्हा पासुन अचानक गाड्यांना आग लागण्याच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. इतके वर्ष लोटली परंतु पेट्रोल अथवा डीझेल वर चालत असलेल्या गाड्यांनी अपघात वगळता कधी अचानक पेट घेतलाय हे माञ ऐकीवात नाही एवढे माञ नक्की!