सीबीडी पोलीस ठाणेकडुन गरजु व गरीब नागरिकांना अन्न धान्याचे वाटप
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासनाकडुन कोव्हीड-19 चा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैनचे आदेश पारीत करण्यात आलेले असुन, लावण्यात आलेल्या कठोर निर्बधित काळात गरीब व गरजु लोकांना हाताळा काम नसल्याने गरजवंत लोकांना अन्न – धान्य, जिवनावश्यक वस्तु यांचे वाटप नवी मुंबई पोलीसांकडुन सेवाभावी संस्थांच्या मदतीने सातत्याने करण्यात येत आहे.
सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतील टाटानगर झोपडपट्टी, से. 190 सीबीडी येथील 2580 कूटुंबियांना सीबीडी पोलीस ठाणे यांचेवतीने अन्न धान्य वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे यापुढेही अशा उपक़मांचे आयोजन करण्यात येत आहे. वरील उपकम हा पोलीस उप आयुक्त, परि-1, वाशी, सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुकत तुर्भे विभाग भरत गाडे, यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे कॉन्टीनेन्टल वेअर हाऊसचे अनिमेश विश्वास यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला. सदर कार्यकमा दरम्यान कोव्हिड – 19 संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सुचना व नियमांचे पालन करण्यात आलेले आहे. मागील वर्षातील लॉकडाऊन कालावधीत देखिल उपेक्षीत, गोर गरीब मजुर तसेच इतर राज्यातील मजुर वर्ग यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई पोलीसांनी सातत्याने प्रयत्नशील राहुन खुप मेहनत घेतलो होती. त्याचप्रमाणे सध्या कडक निर्बंध लादलेले असल्या कारणाने नियम मोडणार्या विरुध्द कठोर कारवाई करीत असतानाच गोर गरीब लोकांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करण्याकामी नवी मुंबई पोलीस पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह व सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली समर्थपणे काम करीत आहेत.