खारघर मधून पाच बकर्यांची चोरी
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः खारघरमधून दोन दिवसांपूर्वी चार गाई आणि बैलाला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून घेऊन गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुसर्याच दिवशी एका व्यक्तीच्या घरासमोरून पाच बकरी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
खारघर रेल्वेस्थानक खाडीकिनार्यालगत शैलेश खोतकर यांच्या गोशाळेतून चोरट्यांनी दोन गाई आणि दोन लहान बैलाला बेशुद्ध करून पळवून नेले होते. ही घटना ताजी असताना चोरट्यांनी गो शाळेपासून काही अंतरावर असलेल्या इस्माईल दोख यांच्या घरासमोरून पाच बकर्यांना पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे प्राणिप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. याविषयी इस्माईल शेख म्हणाले, खारघर पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. खारघर पोलिसांनी पाळीव प्राणी चोरून नेणार्या चोरांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.