शेकडो गरजवंताना खांदेश्वर पोलिसांचा मद्दतीचा हात, मा.सहा.पोलीस आयुक्त सो,पनवले विभाग श्री नितीन भोसले पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप
पनवेल/ वार्ताहर: सध्याची कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यातुन बंद पडलेले व्यवसाय व नोकरी यामुळे सामान्य गरीब लोकांचे अत्यंत हालाकिची परिस्थिती निर्माण झाली आहे . त्याचाच एक भाग म्हणुन मा.पोलीस आयुक्त सो , नवी मुंबई श्री बिपीन कुमार सिंग यांच्या संकल्पनेतुन तसेच मा.पोलीस सह आयुक्त सो , डॉ.जय जाधव , पोलीस उपआयुक्त साो , परिमंडळ २ पनवेल , मा शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली , वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे , श्री देवीदास सोनवणे यांनी व त्यांच्या सहका – यांनी बालग्राम आश्रम से .१२ खांदाकॉलनी या अनाथ लहान मुलांचे आश्रमात , २ ) मंगलाश्रय सामाजिक संस्था से .७ खांदा कॉलनी , या अनाथ मुलींचे आश्रमाला तसेच ३ ) से .५ नवीन पनवेल येथील गुरूद्वरा येथे , मा.सहा.पोलीस आयुक्त सो , पनवले विभाग श्री नितीन भोसले पाटील यांचे हस्ते एकुण १२०० किलो तांदुळ , ६०० किलो गहु , ६०० किलो दाळ , ४५ किलो तेल , १० किलो पीठ व इतर जीवनावश्यक व शाळेच्या वस्तु मदत स्वरूपात देण्यात आल्या .