पळस्पे गाव येथून विवाहिता बेपत्ता
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता विवाहिता घराबाहेर पडली आहे. ती अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सौ.प्रती अरविंद योगी (23 रा.पळस्पे) रंग गोरा, उंची 5 फूट, अंगाने मजबूत, केस काळे लांब, कानामध्ये सोन्याची कर्णफुले, नाकात रिंग, डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत पी गोंदलेले तसेच दोन्ही पायात काळा धागा बांधलेला असून अंगात सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस व सोबत मोबाईल फोन आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस अंमलदार नितीन अखाडे यांच्याशी संपर्क साधावा.