वाईन शॉप फोडून जवळपास रोख रक्कमेसह 5 लाखाचा ऐवज त्रिकुटाने केला लंपास
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः बंद वाईन शॉपच्या मुख्य प्रवेशद्वाराचे ग्रील लोखंडी टॉमीने तोडून अज्ञात 3 चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम 2,16,500/- व 2,88,725/- रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या बाटल्या असा एकूण 5,05,225/- रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील नावडा फेज-2 येथे घडली आहे.
या ठिकाणी असलेल्या बि.एस.वाईन शॉप हे बंद असल्याने पाहून तीन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले व त्यांनी वाईन शॉपच्या मुख्य प्रवेशद्वाराचे ग्रील लोखंडी टॉमीने तोडून अज्ञात 3 चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम 2,16,500/- व 2,88,725/- रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या बाटल्या असा एकूण 5,05,225/- रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार विद्याधर परब यांनी तळोजा पोलीस ठाण्यात केली आहे.