वाजे गाव परिसरात बिअरचा साठा हस्तगत
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः तालुक्यातील वाजे गाव परिसरात बेकायदेशीररित्या विना परवाना बिअर स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याप्रकरणी एका इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वाजे गाव परिसरात विना परवाना बेकायदेशीरपणे बिअर विक्री केली जात असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक नितीन पगार, पो.शि.संदीप चौधरी आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारुन वेगवेगळ्या प्रकारच्या बिअरच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी एका इसमाला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई केली आहे.