पनवेल महानगरपालिकेने सेवाभावी संस्थांना खाजगी रुग्णालयांबरोबर टायअप करून सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी केली मागणी
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका यांनी सेवाभावी संस्थांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करुन सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी द्यावी. यामुळे लसीकरण केंद्रातील गर्दी कमी करण्यास मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेने शहरांमधील मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करुन लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी दिली आहे. सोसायटीच्या आवारामध्ये रुग्णालयांशी बोलून लसीकरण मोहीम राबवता येणार आहे. मात्र यासाठी पुरेश्या प्रमाणात लसी उपलब्ध आहेत का याबरोबरच करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन केलं जात आहे का याकडेही रुग्णालांनी लक्ष देणं बंधनकारक आहे. या लसीकरण मोहिमेचे दर सरकारने खासगी रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले आहेत. यासंदर्भात काही सोसायट्यांनी महापालिकेसोबत चर्चा सुरु केली आहे तर काही सोसायट्यांनी स्वत: लसीकरणासाठी लागणारी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरु केलीय. जर मुंबई महानगरपालिका हा निर्णय घेऊ शकते तर आपल्या पनवेल महानगरपालिका यांनी का घेऊ नये असा पनवेल महानगरपालिक प्रशासनला सवाल विनंती आहे की आपण आपल्या स्थरावर निर्णय घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल.
![पनवेल महानगरपालिकेने सेवाभावी संस्थांना खाजगी रुग्णालयांबरोबर टायअप करून सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी केली मागणी](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2021/05/WhatsApp-Image-2021-05-10-at-14.37.55.jpeg)