क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान…कोरोना योध्दा परिचारिकांनो…! तुमच्या सेवाभावाला सलाम….
पनवेल : पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन होय. महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था असून संस्थापक/अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांनी आज दि.१२ मे २०२१रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे परिचारिकांचा छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थिती मध्ये परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक रुग्णाशी कसलाही दुजाभाव न करता शुश्रूषा करत आहेत. सध्या रुग्णांच्या सगळ्यात जवळची नातेवाईक ही परिचारिकाच असून,त्या ‘सिस्टर’ या नात्याने पूर्ण सेवा देत आहेत. ह्या नारी शक्तींना त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ त्यांना सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर छोटेखानी कार्यक्रम विश्राळी तलाव, मिडल क्लास हौ. सोसायटी जवळ, पनवेल याठिकाणी LOTUS MRI & CT SCAN Center येथे डॉक्टर विकास डोळे यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला. यावेळी परिचारिका प्राची ठाकूर, रत्नमाला पाबरेकर, विशाका शिंदे, अनुराधा सूरी, वैष्णवी खंडागळे, संध्या बळे व इतर कर्मचारी, स्टाफ मेंबर यांना याठिकाणी सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे फॉउंडेशन च्या अध्यक्षा व सदस्या यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच सिडको समाज मंदिर भांटिया शाळा येथे नवीन पनवेल याठिकाणी डॉक्टर सौ.विजया लोहारे यांच्या सहकार्याने परिचारिका संजीवनी ठाकूर, प्रगती राणे, रेश्मा हेमाडे, नैना पाटील, रेणुका गव्हाणकर, ज्योत्स्ना पाटील, प्रियांका वारगे, नीता भांडे, साधना जाधव, विद्या मुंबरे, नीलिमा म्हात्रे, वैजयंती जुईकर, सपना भांबीड,नम्रता पाटील,नम्रता मुंडे, तेजश्री पंडित, नीता वानखेडे, रुपाली गावंडे, अर्चना अर्दरळकर, ज्योती गोवर्धने, दिव्या राणे आदी परिचारिकांना फॉउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ रुपालीताई शिंदे यांच्या हस्ते जागतिक परिचारिका दिनाचे सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा या खास दिनी सन्मान करण्यात आला. क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या सदस्या मा.सौ. यामिनी महाजन आणि मा.सौ.रत्नमाला पाबरेकर यांनी अथक मेहनत घेतली. यावेळी सर्व परिचारिका व इतर स्टाफ भारावून गेले होते. त्यांनी सौ. रुपाली शिंदे व त्यांच्या सदस्या यांचे मनभरून कौतुक केले व आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संम्पन्न करण्यात आला.