“नो व्याकसिनेशन नो जॉब”
अभिजीत सांगळे यांचे मर्चंट नेव्ही आणि क्रुज सिफररर्स ला प्राधान्याने लस मिळावी यासाठी प्रयत्न.
पनवेल, दि.18 ऑल इंडिया सिफररर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन च्या अथक प्रयत्नाना यश आले, ये आपण आता तरी बोलू शकतो पण ह्याची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती. या वैश्विक महामारीच्या काळात जे देश विदेशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते तेव्हा सुद्धा न थांबता न थकता आपले कार्य प्रामाणिक पणे चालू ठेवणारे हे सिफेररर्स होते. वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि इतर जीवन आवश्यक वस्तु पूर्ण जगभर पोचवण्याचे मोलाचे काम यांनी केले. त्यांच्या या कार्याचे जगभरातून कौतुक झाले, त्यांना सन्मान देण्यात आला आणि त्यांना जीवनावश्यक सेवा कर्मचारी म्हणजेच ईसेनशीयल कीवर्कर्स किंवा फ्रँटलाइन किवर्कर्स म्हणून जगभर मान्यता मिळाली. यूनियन चे कार्याध्यक्ष श्री. अभिजीत दिलीप सांगळे स्वत: सिफररर्स असल्याने त्यांनी काळाची गरज लक्षात घेत कोरोना प्रतिबंधनात्मक लस प्राधान्याने सिफररर्सना मिळावी अशी मागणी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आणि वारंवार त्या संबंधी चे पत्रव्यवहार यूनियन चे अध्यक्ष श्री. संजय वासुदेव पवार यांच्या मार्गदर्शनाने शिपिंग मंत्रालय आणि डी जी शिपिंग कडे सुद्धा करण्यात आले.
डी जी शिपिंग कडून या संबंधीचे पत्रक काढण्यात आले. तरी यात बराच कालावधी गेला. मार्च मध्ये जेव्हा पुन्हा एकदा कोरोना ने भारतात हातपाय पसरले तेव्हा जगभरातील बऱ्याच शिपिंग कंपन्यांनी त्यांचे धोरण स्पष्ट केले “नो व्याकसिनेशन नो जॉब”. यामुळे भारतीय सिफररर्स च्या नोकरीवर गदा येत होती. पुन्हा एकदा अभिजीत सांगळे यांनी आपला लासिकरणाचा लढा वेगाने पुढे चालूच ठेवला. अजून काही पत्रक काढण्यात आले, पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुसूत्रता नसल्या मुळे महाराष्ट्रात तशी सुविधा लागू करण्यात तांत्रिक अडचणी दूर करून तातडीने लसीकरण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीण्यात आले. आत्ता डी जी शिपिंग कडून परिपत्रक १५/२०२१ मध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे संपूर्ण भारतात १२ मोठ्या बंदरांवर हॉस्पिटल्स मध्ये लस घेता येण शक्य झाले आहे.
तसेच लासिकरणासाठी जी नाव नोंदणी करायची होती त्यातही तांत्रिक अडचणी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले. व त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. यूनियनला या संबंधी सतत कॉल्स येतात यात प्रामुख्याने राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व हरियाणा यांचा समावेश आहे कारण त्याच्या राज्यात कोणतंही बंदर नसल्याने तेथील कोणतीच हॉस्पिटल्स प्राप्त यादी मध्ये नव्हते. यूनियन तर्फे याबाबतीत मार्गदर्शन केले जाते. वसई विरार मध्ये स्वत: कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांच्या सांगण्यानूसार वसई विरार लसीकरण बूथ वर पाच सिफररर्सचे लसीकरण यूनियन च्या मदतीने केले जाते, हे प्रमाण फार कमी आहे पण यात नक्कीच वाढ होईल असा विश्वास ऑल इंडिया सिफररर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन कडून देण्यात आला आहे.