नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटीलांचे नाव द्या ;पनवेल मधील खैरवाडी ग्रामपंचायतीचा ठराव
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचा नाव देण्याचा ठराव सिडको महामंडळाने केल्यावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.विमानतळाला प्रकल्पग्रस्त नेते व राज्याचे माजी विरोधीपक्ष दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत प्रकल्पग्रस्त संघटना ,काही राजकीय पक्षाचे नेते आग्रही आहेत.या परिस्थितीत पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीने विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत ठराव पारित करून तो शासनाकडे पाठविला आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य अंकेश पांडव यांनी हा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मांडला होता.या ठरावाला भाग्यश्री गजानन कोळंबेकर यांनी अनुमोदन दिले होते.या ठरावाला त्वरित सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.हा ठराव शासनाकडे पाठविन्यात येणार आहे.पनवेल तालुक्यात एकूण 69 ग्रामपंचायती आहेत.सध्याच्या घडीला विमानतळाच्या नामकरणाचा विषय गाजत असताना खैरवाडी हि विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी ठराव करणारी पहिली ग्रामपंचायत बनली आहे.यापुर्वी पनवेल महानगरपालिकेने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमनाताळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत ठराव केला आहे.विमानतळाच्या नामकरणावरून नवी मुंबई मध्ये राजकीय वातावरण तापले असुन प्रकल्पग्रस्त संघटना आक्रमक भूमिका घेत सिडको विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.नुकतीच दि बा पाटील यांचे मुळ गाव जासई याठिकाणी प्रकल्पग्रस्त नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीत नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत सर्व पातळीवर प्रयत्नशील राहण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त नेत्यांनी केला आहे.
