वृद्ध महिलेस लुटले कामोठे वसाहतीत घडली घटना
पनवेल दि.27 (संजय कदम): पायी जात असलेल्या एका वृद्ध महिलेस दोन अनोळखी इसमांनी लुटल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
कुसूम पॉल (वय-63, रा.-कामोठे) या पायी जात असतानादोन अनोळखी इसमांनी काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून त्यांच्याजवळ येऊन त्यापैकी एका इसमाने गाडीवरून उतरून त्यांच्या गळ्यात असलेली 60 हजारांची सोन्याची चेन व त्यात पान, पेंडल व क्रॉस असे दागिने खेचून घेऊन ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार कामोठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.