पनवेल रेल्वे बस टर्मिनल येथील एनएमएमटी बस कर्मचारी यांची क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनकडे मागण्यांच्या पूर्ततेसाठी धाव ; प्रशासनाकडे शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्याची मागणी
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे बस टर्मिनल येथील एनएमएमटी बस कर्मचारी यांना गेले 10 ते 12 वर्षांपासून विविध समस्यांना व अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची तक्रार प्रशासनाला करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांना कळताच त्यांनी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांना या बाबत कळवले असता त्यांनी तात्काळ दखल घेत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे.
त्यात त्यांनी असे नमूद केले कि, पनवेल रेल्वे बस टर्मिनल येथील एनएमएमटी बस प्रवासी कर्मचारी (महिला) 10 ते 15 व पुरूष कर्मचारी 150 ते 170 तसेच इतर प्रवाशी अशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची येथे सकाळ ते रात्री उशिरापर्यंत वर्दळ दिसून येते. गेले 10 ते 12 वर्षांपासून बस स्थानकातील कित्येक कर्मचार्यांना विविध समस्यांना व अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज अंदाजे 150 ते 170 पुरुष कर्मचारी तसेच 10 ते 15 महिला कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. पनवेल रेल्वे स्थानक (वेस्ट) येथील एनएमएमटी बस टर्मिनल च्या कर्मचार्यांना आणि प्रवाशांना संडास, लघुशंका व इतर बाबत गेल्या 10ते12 वर्षा पासून होत असलेल्या गैर सोयी होत असून अश्या परिस्थिती मध्ये सर्व कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. आज महिला वर्ग याठिकाणी कश्या पद्धतीने गुजराण करीत आहे याचा विचार प्रशासनाने करावा, कारण महिलांना विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागत असते. एकाअर्थी पाहिले तर यांना याठिकाणी हालचं सहन करावे लागत आहेत. तसेच कर्मचार्यांचे म्हणणे आहे कि त्यांनी गेल्या 10 ते 12 वर्षात संबंधित प्रशासनाला याविषयी वारंवार जागृत करण्याचे प्रयत्न केले, वारंवार पत्रव्यवहार करून शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची मागणी केली पण एकाही अधिकार्याने याची दखल घेतली नाही. एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी आमच्या फॉउंडेशन कडे मांडली आहे. तरी आपण तातडीने यावर लक्ष घालून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना नवीन पनवेल बस स्थानकजवळ शौचालयाचे बांधकाम करण्यास व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यास आदेश देण्यात यावे व लवकरात लवकर ह्या बस स्थानकातील कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावावेत ही आपणांस क्रांतीज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे नम्र विनंती करीत असल्याचे सांगितले.
