नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव न दिल्यास प्रकल्पबाधित 18 गाव समिती आंदोलन छेडणार
पनवेल दि.07 (वार्ताहर)- नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव न दिल्यास सिडको व शासनाविरोधातप्रकल्पबाधित 18 गाव समिती प्रचंड जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.
यात प्रमुख्याने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळप्रकल्पबाधित 18 गाव समितीचे नंदाजी मुंगाजी, एड. प्रशांत भोईर, महेंद्र पाटील, गजानन पाटील, गोवर्धन डाऊर, सुनिल म्हात्रे, किरण केणी, दत्तात्रय पाटील, जयवंत उर्फ आमदार परदेशी, एड. रेश्मा मुंगाजी, वनिता पाटील, रूपेश धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नंदाजी मुंगाजी यांनी सांगितले की, सिडकोने 1970 साली ठाणे व रायगड जिल्ह्यातील 95 गावांच्या जमिनी नवी मुंबई प्रकल्पासाठी सक्तीने संपादित केल्यामुळे शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी प्रचंड जन आंदोलन उभारले गेले. त्यातूनच 12.5 टक्के विकसित भूवाटप योजना उदयास आली. लोकनेते दि. बा. पाटील यांचे प्रचंड उपकार आम्हा भूमीपुत्रांवर आहेत. त्यामुळे सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून अथवा न्यायालयीन मार्गाने शासनाशी लढा देऊन येणाऱ्या विमानतळालालोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाग पाडू. तरएड. प्रशांत भोईरयांनी सांगितले की पनवेल तालुक्यातील वडघर, करंजाडे, पारगाव, दापोली, ओवळे, कुंडेवहाळ, नानोशी, वाघिवली, उलवे, तरघर इत्यादी ग्रामपंचायतीतील हद्दीत असणाऱ्या गावांच्या जमिनी यानवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या जमिनी शासनाने घेतल्या असल्याने आम्हाला नावाबाबत आग्रह धरण्याचा अधिकार आहे. त्यामुळेलोकनेते दि.बा. पाटील यांचेच नावनवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिले पाहिजे. यासाठी येत्या 10.06.2021 रोजी मानवी साखळी स्वरूपात आंदोलन करणार असून यात 18 गावांचा जाहिर सक्रिय पाठींबा असणार आहे. लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी सन 2014 पासून आम्ही करत आहोत. ज्याची दखल शासनाने घेतली पाहीजे. आमचे आंदोलन हे राजकारण विरहीत असून जो आमच्या सोबत येईल त्यांचे आम्ही स्वागत करू व जो आमच्या विरोधात उतरेल त्याला ग्रामस्थ नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत शासनाने लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव द्यावे असा आग्रह धरला.