अवैधरित्या राहणार्या तीन बांगलादेशीयांवर पनवेल तालुका पोलिसांनी केली कारवाई
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः अवैध मार्गाने वैध प्रवासी कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतात प्रवेश करून पनवेल तालुका परिसरात राहणार्या तीघा बांगलादेशीयांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील नेरे पाडा येथील एका चाळीमध्ये श्रीमती.लाखी गुलाम मलिक (45), मासुद राणा इंदुशेख (27) व श्रीमती.जमूना मासुद राणा (21) हे बेकायदेशीररित्या या ठिकाणी राहत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कारोटे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून या तिघांविरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 चे कलम 3 (अ), सहा.(अ) सह विदेशी नागरिकांचा कायदा 1946 चे कलम 14 (ए) प्रमाणे कारवाई केली आहे