”भारतीय सिफेरर्सना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास शासनाचे नियम जारी”
पनवेल/वार्ताहर:ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन च्या माध्यमातून गेली सहा महिन्यांपासून सिफेरर्सच्या लासिकरणसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत. यूनियन कडून देशाच्या प्रधानमंत्री, शिपिंग मंत्री आणि आरोग्य मंत्री याच्या सोबत वेळोवेळी पत्र व्यवहार करून सिफेरर्सला लासिकरणात प्राधान्य मिळवून देण्यात यश आले आणि संपूर्ण भारतात पहिला डोस उपलब्ध झाला. तसंच दोन डोस मधील अंतर किती असव या संबंधी सुद्धा यूनियन कडून पत्र व्यवहार करण्यात आला होता. देशभरातील सिफेरर्स गेली दीड वर्ष घरी बसून आहेत, बऱ्याच सिफेरर्सला नवीन नोकरी निमित्त बाहेरगावी जायच आहे, पण त्यांचे लसीकरण न झाल्या मुळे त्यांना कामावर रुजू करून घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यूनियन ह्या संदर्भात पूर्ण केंद्रीय मंत्री, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले की अंतर कमीत कमी असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि ते करण्यात आले देखील. आता हे अंतर २८ दिवसां नंतर व ८४ दिवस च्या आत करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त फायदा देशभरातील सिफेरर्स घेत आहेत. आपल्या महाराष्ट्र मध्ये बऱ्याच सिफेरर्सने पहिली लस घेतली आहे. ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन च्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून महाराष्ट्र सरकार ने आपले परिपत्रक जाहीर केले व संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये सिफेरर्स च्या २रा डोस साठी सुरूवात होणारं आहे. वसई विरार नगर पालिका आरोग्य अधिकारी सूरेखा वाळके मॅडम यांच्यांशी यूनियन कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांचा संवाद झाला असता आपण वसई विरार महानगरपालिकेचे परिपत्रक जाहीर करून त्यांवर ३ सेंटर ला मान्यता देवून बूधवार पासून वसई विरार सिफेरर्स चे लसिकरण चालू करू असे सांगण्यात आले. ज्या सिफेरर्स ची जॅाईनिंग जून व जूलै मध्ये आहे अशा सिफेरर्स चे प्राधान्याने लसीकरण चालू करावे. या सर्व प्रक्रियेत यूनियन चे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील सर्व सिफेरर्स ना मार्गदर्शन करतील.