माणगावात हायड्रा खाली सापडून महिलेचा मृत्यू
दि 14 जून माणगांव सचिन पवार माणगावात नेहमीप्रमाणे सकाळी पायी चालत कामावर निघालेल्या महिलेचा हायड्रा ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दिल्याने अपघात झाला. या महिलेचा मृत्यू झाला ही घटना सोमवार दिनांक १४ जून रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास घडली.
माणगाव माणगाव मधील बामनोली रोड परिसरात राहणारे व मूळ गाव कन्नूर केरला येथील महिला विद्या नंदकुमार नदियार वय वर्षे 38 ही महिला गोल्डन पार्क या इमारतीमध्ये साफसफाई व घरकाम करायची सोमवारी सकाळी होती नेहमीप्रमाणे पायी चालत पायी चालत कामावर निघाली होती रस्त्यात अचानक पाठीमागून आलेल्या हायड्रा गाडीने तिला जोरदार धडक देऊन फरफटत नेले यावेळी हाडाचे चाकाखाली सापडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची खबर मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार स्वप्नील कदम, रामनाथ डोईफोडे सागर चितारे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विशाल येळवे ,रावसाहेब कोळेकर ,अक्षय जाधव,यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने विद्या याना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणन्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले ,
या घटनेची फिर्याद वृद्ध महिलेची मुलगी नव्या नंदकुमार नाबियार वय 18 राहणार बामनोली रोड माणगाव,
माणगाव पोलीस ठाण्यात गेल्यानंतर हायड्रा गाडीवरील अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत
दरम्यान विद्या नबियार हिच्या पच्यात 4 मुली असून पतीचे आधीच निधन झाले आहे त्यामुळे या मुलीच्या डोक्यावर चे छपर हरपले असून परीसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे.