मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केली महापालिका आयुक्तांकडे लसिकरण केंद्र वाढवण्यासाठी मागणी.
पनवेल, दि.15 (वार्ताहर)पनवेल महानगरपालिका क्षेत्रा मध्ये लसीकरण सध्या सुरू आहे टप्याटप्याने सुरू झालेले लसीकरण आता अंतिम टप्य्याकडे जात आहे.देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून पासून १८-४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.या वयोगटातील नागरिकांची संख्या लक्षात घेता सध्या असलेले लसीकरण केंद्र अपुरी पडणार आहेत त्यामुळे सर्वच केंद्रांवर झुंबड उडणार आहे,याचा अनुभव ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या वेळी ही आला होता.त्यावेळी जेष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते.या सर्व गोष्टी लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या आधीही लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी पत्रं महापालिका आयुक्त यांच्याकडे दिले आहेत.आपल्या पत्राची दखल घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या महापालिका आयुक्त नक्की वाढवतील आणि पनवेलकरांना दिलासा देतील असें रास्त मत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.
