माणगाव जवळील गारल गाव येथील दुर्घटना अपघात औषधाचा ट्रक उलटला क्लीनरचा मृत्यू ,चालक जखमी
, सचिन पवार मानगाव रायगड/मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव पासून पाच किमी अंतरावर, असणाऱ्या गारल गावच्या हद्दीत औषधे घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात क्लीनर चा जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक जखमी झाला आहे ,
ही दुर्घटना सोमवारी( 21 जून) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडले या अपघाताची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महादेव कराले यांनी दिली आहे चालक प्रितेश
भागोजी गोलांबडे राहणार वडपाले तालुका माणगाव हा त्यांच्या ताब्यातील ट्रक मध्ये औषधाचे बस घेऊन जात होता गारल गावच्या हद्दीत भरधाव वेगाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्नात त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उलटला या अपघातात ट्रकचा क्लीनर प्रणय अनिल करबेले राहणार वाढवले तालुका माणगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक प्रितेश गोळा बडे हा जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटना घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळाचे पाहणी केली या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे ट्रक चालक प्रितेश गोलांबडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस
निरीक्षक विश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साळगावकर हे करीत आहेत.