उद्योजक रमण खुटले यांच्यातर्फे नेरेपाडा येथे छत्री वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील खुटल्याचा पाडा येथे आज गावातील जेष्ठ नागरिकांना व लहान मुलांना रमण खुटले यांचे चिरंजीव अर्णव रमण खुटले यांच्या १० व्या वाढदिवसानिमित्त पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणू साथीचा आजार सर्वत्र फैलावले असताना अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे अशातच आता पावसाळा सुरू झाल्याने छत्री व रेनकोट देखील काहीजण घेऊ शकत नाही या जाणिवेतून उद्योजक रमण खुटले यांच्यासारखे दानशूर व गावचे सुपुत्र यांनी गावामध्ये छत्री वाटप केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपाचा कार्यक्रम केला. यावेळी उद्योजक संजय नोगजा, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे संचालक संतोष पाटील, कोकण संध्याचे संपादक दिपक महाडिक, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, हरीग्रामचे माजी सरपंच अरुण पाटील, लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे, संतोष आमले यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.