श्री.बापुसाहेब डी.डी.विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवीन पनवेल अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल /वार्ताहर :श्री.बापुसाहेब डी.डी.विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दि. २६ जून २०२१ सायंकाळी ४.०० वाजता ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.डॉ.मीनाक्षी मोरे,ज्येष्ठ प्राध्यापिका,आचार्य जावडेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन,गारगोटी,श्री.मौनी विद्यापीठ,कोल्हापूर. आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा.धनराजजी विसपुते,संस्थेच्या संचालिका मा.सौ.संगीता विसपुते,बी.एड.व एम.एड.महाविद्यालयाच्या प्राचार्या, डॉ.सीमा कांबळे तसेच सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमाने उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत व्हॅच्युअल दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती दाखवण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल तयार करण्यात आलेल्या Google Form चे व्हॅच्युअल पद्धतीने उदघाटन करण्यात आले.बी.एड.प्रथम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.डॉ.मीनाक्षी मोरे यांनी आपल्या वक्तव्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे महान कार्य सांगितले. बी.एड.व एम.एड.महाविद्यालयाच्या प्राचार्या,सीमा कांबळे यांनी देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी माहिती सांगितली.यानंतर अध्यक्षीय भाषण आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष मा.धनराजजी विसपुते यांनी केले.त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या अनन्य साधारण कार्याची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे तसेच सर्व श्रोत्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.