वडाचे झाड लावण्याच्या ठिकाणावरून केली मारहाण
पनवेल दि.28 (वार्ताहर): वडाचे झाड लावण्याच्या ठिकाणावरून एका सलून चालकाला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कल्ले गावाच्या हद्दीत घडली आहे.
कल्ले गावाच्या हद्दीत अनंत यादव (वय-55) यांचे सलून असून तेथे कापलेले केस हे ते त्यांच्या घरासमोरील जागेत टाकत असतात. त्या ठिकाणी नारायण सावंत (वय-40) हे वडाचे झाड लावण्यास गेले असता अनंत यादव यांनी मी येथे लोकांचे केस कापलेले टाकतो, येथे वडाचे झाड लावू नकोस असे सांगितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन सावंत यांनी लाकडे, दांडका उचलून यादव यांच्या डोक्यात व शरिरावर उपट्या मारून त्यांना दुखापत केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.