नवी मुबंई विमानतळच्या नामांतरण आंदोलन दरम्यान शिवसेना प्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे साहेब व मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या संबधितावर फौजदारी कारवाईची मागणी
पनवेल /प्रतिनिधी आज दिनांक २९ जून २०२१ रोजी नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण आंदोलन दिनांक २४ जून २०२१ रोजी विमानतळाच्या नामकरण्याच्या मागणीकरिता सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चा मध्ये काही आंदोलकाकडून शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट सन्मानिय बाळासाहेब ठाकरे साहेब व शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय उद्धवजी ठाकरे साहेब यांना शिवीगाळ करून माणुसकिला काळिमा फासेल अश्या प्रकारची शिवीगाळ केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्या प्रकरणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री. शिरीष घरत साहेब व शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार श्री. बबनदादा पाटील यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त यांच्या कडे संबधितावर फौजदारी कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. सोबत शिवसेना पनवेल उपमहानगर प्रमुख श्री. दिपक घरत उपस्थित होते.