रोटरी क्लब ऑफ पनवेल पदग्रहण समारंभ
पनवेल/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ पनवेल चा ६१ वा पदग्रहण समारंभ रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल ब्लड बॅक, खांदा कॉलनी येथे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा व रो. प्रिया शहा यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. नुतन अध्यक्ष रो. विजय मंडलिक; सचिव रो. राजेंद्र मोरे आणि सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी नवीन वर्षासाठी कार्यभार स्वीकारला. या कार्यक्रमास ए. जी. रो. डॉ. रमेश पटेल, फाउंडेशन डायरेक्टर रो. पंकज पटेल, पी. डी. जी. रो. डॅा. दिपक पुरोहित, पी.डी.जी. रो. डॉ. शैलेश पालेकर, क्लब ट्रेनर रो. डॉ. दिपक कुलकर्णी, इतर मान्यवर व क्लब सभासदांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲन रेखा म्हात्रे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पनवेल चे २०२१-२२ चे सर्व पदाधिकारी या वर्षी पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यास कटिबध्द आहेत. गेली अनेक वर्ष रोटरी क्लब ऑफ पनवेल आपल्या समाजोपयोगी उपक्रमातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यास प्रयत्नशील आहे. या वर्षी योजलेल्या उपक्रमातून रोटरी इंटरनॅशनलचे या वर्षाचे ब्रीद वाक्य ‘Serve to Change Lives’ प्रत्यक्षात उतरवण्याचा मानस नवनिर्वाचीत कार्यकारीणीने व्यक्त केला.