उरण-भवरा येथील मच्छीमार बेपत्ता.मोरा सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )उरणमधील मोरा बंदर जवळील भवरा आदिवासी वाडीतील मच्छीमार राजू रमेश कातकरी वय 32 हे दिनांक 4 /7/2021 रोजी सकाळी साडे आठ वाजता कामाला जातो म्हणून घरातून सांगून गेले ते परत परत घरी आलेच नाही.त्यामुळे सदर तक्रार मोरा सागरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 5 फूट 6 इंच, रंग सावळा, केस काळे दाढी मिशी वाढलेले ,अंगात सफेद रंगाचा फुल बाह्याचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळा रंगाचे सॅंडल तसेच सोबत एक्टिवा टू व्हीलर MH 46 AW 3513 घेऊन गेले आहेत. तरी सदर हरविलेली व्यक्ती कोणाला आढळल्यास मोरा सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.