कंपनीच्या CSR फंडातून उरण तालुक्यातील सर्व गावात लसीकरण करण्याची जनतेची मागणी.उरण तालुक्यातील सर्व गावांना लसीकरण करण्यासाठी तहसीलदार यांचे दालनात बैठक
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कोविड रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचे दालनात तहसील कार्यालय उरण येथे मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते या वेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,पंचायत समिती उरणचे सभापती ऍड सागर कडू, उपसभापती शुभांगी सुरेश पाटील,पंचायत समिती गटविकास अधिकारी नीलम गाडे,पंचायत समिती सदस्य वैशाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,पंचायत समिती सदस्य हिराजी भोईर,माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड,उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र इटकारे, डॉ भोसले व विविध कंपनीचे प्रतिनिधी हजर होते.
उरण तालुक्यातील गावांना होत असेलला लसीचा अपुरा पुरवठा, अपुरा साठा यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.लसीकरण सर्व नागरिकांचे वेळेवर होणे गरजेचे आहे यासाठी उरण पंचायत समिती यांच्या माध्यमातून सर्व कंपनी याना लेखी पत्र देऊन लसीकरण करण्यासाठी कंपनीने CSR फंडातून खर्च करावा यासाठी दोन पत्रे देण्यात आल्याची माहिती सभापती ऍड सागर कडू यांनी उपस्थित मान्यवरांना दिली. उरण तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व कंपन्या,सर्व सि एफ एस गोडाऊन यांनी एकत्रित रित्या खर्च करून सामाजिक दायित्व भूमिका घेऊन यासाठी येणारा सर्व खर्च करावा असेही मत व्यक्त करण्यात आले.यावेळी विविध कंपनीचे प्रतिनिधी हजर होते. या निर्णयामुळे तालुक्यातील लसीकरण वेगाने होऊन कोरोना मुक्ती कडे वाटचाल होईल.शेकडो लोकांचे जीव वाचतील. कोरोना मध्ये नोकरीं नाही, रोजगार नाही, जवळ पैसा नाही अश्या परिस्थितीत गोरगरीब जनतेला या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे उरणच्या नागरिकांकडून, सर्व स्तरातून स्वागत होत आहे.