जागतिक अवयव दान दिनानिमित्त किरण मढवी यांचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प.
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )मरावे परी अवयव रुपी उरावे.अवयव दान कोणीही करु शकतो, अवयव दानास ना जात आडवी येतो ना धर्म.म्हणुनच अवयव दान हे सर्व जाती- धर्मात सर्वश्रेष्ठ मानले जाते.१३ ऑगस्ट हा जागतिक अवयव दान दिन म्हणुन जगभर साजरा होत असल्याने नवी मुंबई-उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी जागतिक अवयव दान दिनानिमित्त मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प एम जी एम न्यु बॉम्बे हॉस्पिटल वाशी, नवी मुंबई येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती ( ZTCC ) येथे केला.मुत्युनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया या विचाराने वाटचाल करित गेल्या वर्षी १० जून रोजी जागतिक नेत्रदान दिनानिमित्त मरणोत्तर नेत्रदान केले तर या वर्षी अवयव दानाचे संकल्प पुर्ण करुन किरण मढवी यांनी समाजासमोर नवा आदर्श ऊभा केला आहे. एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यावर त्याच्या शरीरातील महत्वाचे अवयव नष्ट होतात. मात्र मृत्युनंतर तेच अवयव दान केल्याने अनेक रूग्णांना जीवनदान मिळू शकतो, त्यामुळे समाजात अवयव दानाचे महत्व नागरिकांना कळावे यासाठी किरण मढवी यांनी स्वत: संकल्प करुन पुढे वटवृक्ष सामाजिक संस्था व ईतर वैद्यकीय सामाजिक कार्य करणाऱ्यांसोबत समाजात जणजागृती अभियान राबवणार असल्याचे मत यावेळी किरण मढवी यांनी व्यक्त केले.यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय विटेकर यांच्या मार्गदर्शाना खाली किरण मढवी यांनी मरणोत्तर अवयदानाचे संकल्प पुर्ण केले.