उलवे शहरात स्वातंत्र्य दिनी झाडांचे शतक साजरे !!
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ.सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी संपुर्ण महाराष्ट्रास १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी दिनानिमित्त सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेमार्फत शंभर झाडे लावून झाडांचे शतक साजरे करण्याचे आवाहन केले होते आणि ते आवाहन उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेनी स्विकारुन उलवे सेक्टर २० रँडक्लिफ स्कुलच्या मागील परिसरात सह्याद्री देवराई मार्फत दिलेल्या वृक्ष सुचीनुसार वृक्ष लागवड करुन उलवेमधे झाडांचे शतक साजरे झाले.. ह्या कार्यक्रमाचे शुभारंभ तथा पहिला वटवृक्ष कामगार नेते महेंद्र घरत साहेब आणि साई देवस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते लावुन वृक्ष लागवड अभियानास सुरुवात झाली. यावेळी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल कामगार नेते महेंद्र घरत यांनी अभिनंदन केले. तसेच उलवे शहरांत देशी वृक्षांची संख्या फारच कमी आहे आणि देशीवृक्षलागवडीवर भर देणाऱ्या वटवृक्ष सामाजिक संस्थेचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी उलव्यातील अनेक वृक्ष प्रेमींनी या अभियानात सहभागी होऊन लावलेला प्रत्येक झाडाचे योग्य संगोपन करुन पुढच्या वर्षी झाडांचा वाढदिवस साजरा होईल असे मत संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी मांडले. सह्याद्री देवराईचे सचिन चांदणे यांच्या मार्गदर्शानाखाली राबवलेले झाडांचे शतक वृक्ष अभियानास प्रमुख उपस्थिती म्हणुन परिक्षित ठाकूर, वसंत वळकुंडे, धनजंय तांबे, माजी सैनिक निलेश म्हात्रे, एकनाथ मढवी, प्रगतशील शेतकरी प्रशांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष नंदेश ठाकूर, आदि वृक्षप्रेमींनी उलवे नगरीत अठरा प्रकारची विविध शंभर झाडे लावून झाडांचे शतक साजरे केले.