दागिन्यांच्या दुकानातील कर्मचाऱयाने केला पावणे आठ लाख रुपयांचा अपहार
पनवेल (वार्ताहर):सीवूड्स येथील ग्रँड सेंट्रल मॉल मधील टायटन मिया बाय तनिष्क या दागिन्यांच्या दुकानात कामाला असलेल्या एका कामगाराने दुकानातील सुमारे पावणे आठ लाख रुपयांच्या गोल्ड क्वाईन व रोख रक्कमेचा अपहार करुन पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. श्यामराव गोळे असे या कर्मचाऱयाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहारासह चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार साहिल गुफ्ता हा एसजीबीएल इंडिया लि. या कंपनीचा डायरेक्टर असून त्याच्या कंपनीचे सीवूड्स मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये टायटन आय प्लस व टायटनची मिया बाय तनिष्कच्या दागिन्यांचे दुकान आहे. जानेवारी 2020 मध्ये या दुकानात कामगाराची आवश्यकता असल्याने या कंपनीने कामगाराची शोधा-शोध सुरु केली होती. त्यावेळी टायटन कंपनीने शामराव गोळे याची माहिती कंपनीला पाठवुन दिली होती. त्यामुळे गुफ्ता याने गोळे याला आपल्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला ठेवले होते. दरम्यानच्या काळात या दुकानाच्या मॅनेजरने काम सोडल्याने गुफ्ता याने त्याच्या जागी गोळे याला मॅनेजर केले. सदर दुकानात कामाला असलेल्या महिलेने देखील काम सोडल्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे गुफ्ता यांनी दुसरे कामगार न ठेवता, एकटÎा श्यामराव गोळे या एकटÎावर दुकानाची जबाबदारी सोपविली.
याचाच फायदा उचलत शामराव गोळे याने टायटनच्या शोरुममध्ये आलेले सोन्याच्या कॉईनमधील बारा क्वाईनची चोरी केली. त्याचप्रमाणे कुठल्याही ग्राहकाने सात गोल्ड क्वाईन दुकानात आणून दिलेले नसताना श्यामराव गोळे याने कुणाला काहीही माहिती न देता, परस्पर दुकान उघडून ग्राहकाने दुकानात गोल्ड क्वाईन आणून दिल्याचे भासवून याबाबतची नोंद सिस्टीममध्ये केली. तसेच सदर क्वाईन परत आल्याचे टायटन कंपनीला कळवुन कंपनीकडून स्वत:च्या अकाऊंटवर पैसे मागवुन घेतले. त्याचप्रमाणे त्याने दुकानाच्या काऊंटरवर जमा झालेली 31 हजाराची रक्कम देखील चोरली. अशा पद्धतीने श्यामराव गोळे याने दुकानातील सुमारे पावणे आठ लाख रुपयांचा अपहार करुन पलायन केल्याने कंपनीचे डायरेक्टर गुफ्ता यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात पार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी श्यामराव गोळे याच्या विरोधात अपहार व चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.