तळोजा औद्योगिक वसाहत येथून रिक्षाची चोरी
दि.21 (संजय कदम)- तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हिंडाल्को कंपनीच्या गेटसमोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली 1 लाख 30 हजारांची ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे.
योगेश फडके (वय-41) यांनी त्यांची एमएच 46 बीडी 6715 हि रिक्षा त्याठिकाणी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.