पनवेलकरांच्या मानात अजून एक तुरा ; अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाकडून नव्याने पेट्रोल पंपाचे उद्घाटन
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी नव्याने पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील माणगाव येथे पनवेल येथे निवासी असलेले व शेडुंग टोल नाका येथे पेट्रोल पंप असणार्या अमोल ऑटो मोबाईल्स यांना नवीन पेट्रोल उभारणी करण्याचा मान मिळून त्याची आज प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.
केंद्र शासनाच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत भारत पेट्रोलियम यांच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कोंबो पॅक पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पेट्रोल पंपासह सीएनजी, डिझेल, ऑईल चेकींग, स्नॅक्स, पंप हाऊस, हवा भरण्याचे केंद्र व इतर सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याअंतर्गत माणगाव येथे मुख्य रस्त्यावर लक्ष्मण फ्युल स्टेशनची उभारणी करून त्याची सुरूवात केंद्रीय मंत्र्यांनी ऑनलाईन केली. यावेळी भारत पेट्रोलियमचे स्टेट हेड (रिटेल) रमण मलिक, जनरल मॅनेजर रिटेल व प्लॅनिंगचे अचमण त्रेहान, जनरल मॅनेजर हायवे रिटेलचे अनुप तनेजा, इंजिनिअर स्टेट लेव्हलचे रमेश मिनी, टेरीटरी मॅनेजर मुंबई उमेश कुलकर्णी, लक्ष्मण पाटील, प्रवीण पाटील, अस्मित पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून उद्घाटन करण्यात आले व या पेट्रोल पंपाचा फायदा कोकणात जाणार्या लाखो गाड्यांना होणार आहे. यानिमित्ताने त्या परिसरात वृक्षारोपणासह सामाजिक उपक्रमही राबविण्यात आला.
कोट
श्री नारायण महाराज कृपा व त्यांच्या आशिर्वादाने तसेच केंद्र शासनाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सुरू केला असून त्याचा फायदा कोकणात जाणार्या बांधवांनी घ्यावा ः डायरेक्टर प्रवीण पाटील
फोटो ः पेट्रोल पंपाचे उद्घाटन करताना मान्यवर.