ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन यांच्या मागणीला राज्यपालकांकडून सकारात्मक प्रतिसाद
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन यांच्या मागणीला राज्यपालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून शिपिंग क्षेत्रातील आर्थिक फसवणुकीच्या ठोस उपायोजना करण्याच्या निवेदनाला राज्यपालांकडून पुढील कारवाईसाठी गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे यावेळी अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे आणि खजिनदार शितल शिवाजीराव मोरे आदींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून शिपींग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून होत असलेल्या आर्थिक फसवणुकीबाबतची माहिती त्यांना देवून ही फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत ठोस उपाय योजना होणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष संजय पवार यांनी चर्चेमध्ये व तसेच निवेदन देताना मांडले होते. या मागणीची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेवून सदर मागणी संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्याकडे कारवाई करण्या संदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे लवकरच अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीला आळा बसेल असा ठाम विश्वास ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या मार्फत वर्तविण्यात आला आहे.