शिवसेनेच्या दणक्याने ग्राहकाला टिव्हि मिळाला परत
पनवेल दि.01 (वार्ताहर)- दूकानात खरेदी केलेला टिव्ही हा नादुरूस्त असल्याचे सांगूनसुद्धा ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आर्सी इलेक्ट्रॉनिक्स या दूकानावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाऊन जाब विचारताच तात्काळ त्यांनी सदर टिव्ही बदलून दिला आहे.
कमलेश यादव नावाच्या व्यक्तीने दोन वर्षा पूर्वी आर्सी इलेक्ट्रॉनिक्स, कळंबोली येथून हायर कंपनीचा ४० ईंचाचा टीव्ही विकत घेतला होता, ४ महिन्यातच तो टीव्ही बंद पडला. वारंवार तक्रार करून सुद्दा सर्विस सेन्टर वाले लक्ष देत नव्हते व आले तरी ते सारखे सर्विस चार्जे रु.१५००-२००० घेत होते. कमलेश यादव यांनी हि बाब कळंबोली शिवसेना शहर समन्वयक गिरीश धुमाळ यांच्या कानावर घातली असता, गिरीश धुमाळ आणि त्यांचे सहकारी यांनी आर्सी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाऊन मॅनेजर सोबत चर्चा करून कमलेश यादव यांना हायर कंपनीचा ४३ ईंचाचा नवीन टीव्ही मिळवून दिला. कमलेश यादव यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी गिरीश धुमाळ यांचे मानले. त्या वेळेस शिवसैनिक विजय बाबा, उपतालुका संघटक सौ. टिया धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, उपविभाग प्रमुख दीपक कोडवते, विभाग संघटक आशुतोष शेंडगे उपस्थित होते.