कोलाड येथे खैर वाहतूक करणारा ट्रक वनरक्षकांच्या जाळ्यात
प्रतिनिधी:सचिन पवार माणगांव रायगड/दि.२/९/२०२१(कोलाड) उपवनसंरक्षक रोहा श्री अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनरक्षक रोहा विश्वजित जाधव याच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण रोहा श्री कांबळी व वनरक्षक रोहा फिरते पथक श्री अजिक्य कदम यांनी मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड सुपर मार्केट जवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड वनरक्षक अधिकारी यांनी सापळा रचून पकडला आहे.
सविस्तर वृत्त असे कि बुधवार दि.१सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडी पडगा येथून निघालेला खेराचा अवैध भरून निघालेला ट्रक हा चिपळूण सावर्डे येथे चालला असता खैर भरून जाणारा ट्रक गाडी नंबर GJ१५, AT ७८५१ हा कोलाड येथील सुपर मार्केट जवळ आला असता Gj १५ At ७८५१ याच्यामध्ये एकूण १९ घनमीटर इतका माल जप्त केला असून वनरक्षक अधिकारी कांबळी व अजिंक्य कदम यांनी सापळा रचून पकडले असुन वनरक्षक अधिकारी यांनी वाहनचालक नजमुद्दीन याला ताब्यात घेतले असुन अधिक तपास वनरक्षक अधिकारी करीत आहेत.