देशी दारुचा साठा हस्तगत
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील मोठे धामणी परिसरातून देशी दारुचा साठा हस्तगत केला आहे.
मोठी धामणी येथे मोठ्या प्रमाणात देशी दारुच्या प्लॅस्टीकच्या बाटल्या ज्याची किंमत जवळपास 6 हजार रुपये इतकी आहे. तेथील एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवली असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.(गुन्हे) अंकुश खेडकर, सपोनि नितीन पगार, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पो.हवा.अमोल कांबळे, पो.नाईक बाळकृष्ण अधिकारी आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारुन सदर माल हस्तगत केला आहे.
![देशी दारुचा साठा हस्तगत](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2021/08/1589705802725.png)