मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तातडीने बदलून घेतले ड्रेनेज झाकणं.
प्रभागातील समस्यांचे निरसन करण्यास कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच तत्पर असतात.समस्या छोटी असो की मोठी ते स्वतः जातीने लक्ष घालून काम पूर्ण करून घेतात.चिंतामणी हॉल आणि ओझा हॉस्पिटल समोरील ड्रेनेज झाकणं तुटली असून या हम रस्त्यावरील रहदारी बघता एखादी दुर्घटना होऊ शकते,ही बाब काही दक्ष नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन यांनी तातकाळ महानगरपालिकेला पत्र दिले व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ काँट्रॅक्टरला नवीन ड्रेनेज झाकणं लावून घेण्यास सांगितले.
नगरसेवक विक्रांत पाटील यांचे बारीक लक्ष प्रभागात असतं याबद्दल नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.