उरण शहर येथे मेगा मेडिकल चेकअप कॅम्प ला उत्तम प्रतिसाद.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येकाला निरोगी, सुंदर आयुष्य जगता यावे या दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ उरण,उरण डॉक्टर असोसिएशन, राजे शिवाजी मित्र मंडळ यांच्या वतीने बुरुड आळी, उरण शहर येथे मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या मेडिकल कॅम्पला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे उदघाटन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, लायन्स क्लब डिस्ट्रिक गव्हर्नर लायन लूनकरण तावरी यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शिबिरामध्ये छाती-ईसीजी तपासणी,रक्त तपासणी,थायरॉईड तपासणी,डायबेटीस(मधुमेह)तपासणी, हाय ब्लड प्रेशर (BP),स्त्रीरोग, हाड व संधिवात, डोळे तपासणी, त्वचारोग, दंतचिकित्सा, काचबिंदू शस्त्रक्रिया आदी विविध रोगाशी संबंधित तपासणी करण्यात आले.
यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. संतोष गाडे, अस्थिरोग तज्ञ डॉ. संतोष वर्मा, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रीती गाडे,मेडिसिन तज्ञ डॉक्टर आकाश भारती, हृदयरोग तज्ञ डॉ. प्रशांत पवार, मधुमेह तज्ञ डॉ राहुल वर्मा, दंत रोग तज्ञ-डॉ शिवानी गाडे, बालरोग तज्ञ डॉ चेतन पाटील, जनरल फिजिशियन डॉ अमोल गिरी, त्वचारोग तज्ञ-डॉ सविता गिरी, नेत्ररोग तज्ञ डॉ अमोल गिरी, वंध्यत्व, संतती टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे -डॉ अनिता कोळी, डॉ क्लिटा परेरा आदी डॉक्टरांनी शिबिरात येणाऱ्या नागरिकांची, रुग्णांची तपासणी करून रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन केले. नागरिकांचे सर्व तपासण्या मोफत केल्या तसेच यावेळी रुग्णांना मोफत औषधे, गोळ्या देण्यात आले.
राजे शिवाजी मित्र मंडळाची स्थापना 1992 साली झाली. या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचे हे 30 वे वर्ष असून कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची काळजी घेत सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळत, मास्क व सॅनिटायजरचा वापर करून मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले.सदर मेगा मेडिकल चेकअप कॅम्प यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ उरण, उरण डॉक्टर असोसिएशन, राजे शिवाजी मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी -सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. एकाच ठिकाणी नागरिकांना, रुग्णांना सर्वच मेडिकल चेकअप सुविधा तेही उत्तम पद्धतीने मिळाल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा झाला. सदर उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी सर्वांचे आभार मानले आहे.
उरण विधानसभेचे विद्यमान आमदार महेश बालदी,भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक कौशिक शहा,लायन्स क्लब ऑफ उरणचे प्रेसिडेंट लायन नरेंद्र ठाकूर, सेक्रेटरी लायन निलिमा नारखेडे, खजिनदार लायन मनिष घरत, उपाध्यक्ष लायन सदानंद गायकवाड, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन-डॉ प्रीती गाडे, संजीव अग्रवाल,दत्तात्रेय नवाले, साहेबराव ओहोळ, चंद्रकांत ठक्कर, शंकर कोळी, स्वप्ना गायकवाड तसेच उरण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रीती गाडे, सेक्रेटरी -डॉ पल्लवी पाटील, खजिनदार -डॉ भक्ती कुंडेलवाल आणि राजे शिवाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास खैरे, अध्यक्ष प्रथमेश गायकवाड, सेक्रेटरी कल्पेश खैरे, उपाध्यक्ष सुरज पडवळ, खजिनदार -संकेत गायकवाड, संस्थापक कार्यकारिणी -समीर गाडे, कुणाल गायकवाड, रितेश गायकवाड, दिपक खैरे, सचिन सोनकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.