फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अँड चायनीज फूड व्हॅनचे दिमाखात उदघाटन.मान्यनावरांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा.
पनवेल / प्रतिनिधी : आजकाल कोरोना काळामध्ये अनेक रोजगार निर्मिती बंद झाले असून अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. याच कोरोना काळामध्ये तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करून नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आजचे तरुण – तरुणी प्रयत्न करीत आहेत. याच उद्देशाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अँड चायनीज फूड व्हॅन सुरु केले आहे. या फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अँड चायनीज फूड व्हॅनचे आज दिमाखात उदघाटन झाले. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेशशेठ ठाकूर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक बालदन गावंडे, युवा नेते मयुरेश नेतकर, नगरसवेक राजुशेठ सोनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आदिती सोनार, माजी नगरसवेक अच्युत मनोरे, माजी नगरसेविका नीता माळी, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, सचिव डी.डी. गायकवाड, सल्लागार डॉ.गोरख बोबडे, सहचिटणीस सचिन लोखंडे, सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, तालुकाध्यक्ष कैलास रक्ताटे, सचिव अमित आल्हाट, समाजसेविका नूरजहाँ कुरेशी, चित्रा देशमुख, जस्मिन नजे, आयेशा कुरेशी, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेछा दिल्या. यावेळी पनवेलमधील धडाडीचे तरुण तडफदार पत्रकार तथा पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.