शिवसेना शाखाप्रमुख दिपक घरत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील यांच्या घरच्या गणपतीला नाटक कलाकार निखिल गोरे यांची भेट.
पनवेल/प्रतिनिधी:हरिग्राम पनवेल येथील एक नवोदित कलाकार म्हणून आपल्या जीवनात स्वताच्या अंगात असणारी बालपणापासूनच अभिनयाची कला जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच त्यांनी त्या मिळालेल्या संधीचे सोने करून हरिग्राम पनवेलकरांचे नाव उज्ज्वल केले आहे. शालेय वयापासूनच स्नेहसंमेलन असेल तर नाटके असतील त्या प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्याने आज मोठ्या पडद्यावर काम करताना आनंदासोबत काम करत पनवेलकरांचे नाव मोठे करण्याची संधी मिळाली. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा होता तो म्हणजे वडिलांचा व्यवसायासोबतच सुनिल गोरेंनी वेळोवेळी सहकार्य केल्याने आज इथपर्यंत पोहोचलो अशी भावना निखिल गोरेंनी व्यक्त केली. हे सर्व करत असताना प्रेषकांसोबत मित्र परिवाराची साथ देखील मोलाची होती. हरिग्राम पनवेल येथे मित्र परिवाराच्या घरी भेट दिली त्यावेळी नाटक कलाकार निखिल गोरेंचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान पनवेल शहर प्रमुख बिंदास ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, हरिग्राम शिवसेना शाखा प्रमुख दिपक घरत, उपशाखा प्रमुख सुभाष जळे, तसेच इतर मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी निखिल गोरेंनी सांगितले या क्षेत्रात काम करत असताना सोबत वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालून पुढे युवा उद्योजक म्हणून समोर येण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.