स्वाभिमानी रिक्षा मंचाच्या वतीने ,‛ महाराष्ट्र राज्यातील विविध ऑटोरिक्षा संघटना प्रतिनिधीचे दोन दिवशीय परिषद’
पनवेल /दि.25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी स्वाभिमानी रिक्षा मंचाच्या वतीने ,‛ महाराष्ट्र राज्यातील विविध ऑटोरिक्षा संघटना प्रतिनिधीचे दोन दिवशीय परिषद’,श्री संत सावता माळी सभागृह , पनवेल , नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे…!तरी सर्व ऑटो पदाधिकारी यांनी या परिषदेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले
स्वाभिमानी रिक्षा मंचाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विविध ऑटोरिक्षा संघटना प्रतिनिधीचे राज्यस्तरीय दोन दिवशीय परिषद पनवेल , नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे…!महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेचे प्रतिनिधी या परिषदेत सामील होत आहेत.
या राज्यस्तरीय दोन दिवसीय परिषदेत ऑटोरिक्षा चालकांच्या दैनंदिन जीवनातील समस्येवर चिंतन – मनन करण्यात येणार आहे.
यात प्रामुख्याने खालील विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे
१) ऑटोरिक्षा चालकांचे घोषणा झालेल्या कल्याणकारी मंडळाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावेत.
२) ऑटोरिक्षा चालक प्रतिनिधीला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्यात यावेत.
३) राज्यातील ऑटोरिक्षाचे चालू असलेले खुले ऑटो परमिट तात्काळ बंद करावेत.
४) ऑटोरिक्षाची वाढलेली संख्या लक्षात घेऊन प्रत्येक शहर , महानगर ,जिल्हा , तालुका व गावपातळीवर नव्याने सर्व्हे करून नवे ऑटोस्टँड निर्माण करून देण्यात यावेत.
५) ऑटोरिक्षाच्या कागदपत्रास 31 मार्च 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात यावेत..
इत्यादी अनेक विषयांवर स्वाभिमानी रिक्षा मंचाच्या माध्यमातून चिंतन -मनन परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्वाभिमानी रिक्षा मंचाचे चिंतन – मनन परिषद हे शांततेत पार पडणार आहे . प्रशासन स्तरांवर याची नोंद घेवावेत.
या राज्यस्तरीय परिषदेत जास्तीत जास्त ऑटोरिक्षा संघटनेचे प्रतिनिधी व ऑटोरिक्षा चालक बांधव उपस्थित राहून सहकार्य करावेत.संयोजक .श्री मधुकर थोरात ,रोशन थोरात ,अशोक पाटील ,परेश गोंधळी दशरथ डांगरकर ,सुभाष पाटील ,अविनाश भरनुके ,नदीम तूपके , अनंता महाडिक,राहुल पाटील सोहेल राखे ,अफजल शेख,शिवदास ठाकूर ,दशरथ मते,विनोद मधवी.